देवगिरी बँकेच्या अर्थसाह्याने साकार करा मनातली स्वप्ने
माणसाच्या जीवनात अनेक अडचणी असल्या तरी, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही असतोच. जीवनात उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्ने साकार करण्यासाठीही काही ना काही मार्ग सापडतोच. सामान्य कुटुंबाचे सर्वात मोठे स्वप्न असते, ते म्हणजे स्वतःच्या घराचे. शहरात आपलाही छानसा फ्लॅट किंवा घर असावे, ही इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. त्यासाठी खूप मोठी धडपडही सुरु असते, पण प्रश्न असतो पैशांचा. बँकांद्वारे मिळणाऱ्या गृहकर्ज व मासिक हप्त्याचा. गृहखरेदीसाठी लागणारी मोठी रक्कम कशी उभारायची, या विचारचक्रात तुम्हीही असाल, तर देवगिरी बँकेचे गृहकर्ज व इतर कर्ज योजना तुमच्यासाठी परफेक्ट आहेत.
देवगिरी बँक गृहकर्ज
देवगिरी बँकेच्या अर्थसाह्यातून तुम्ही तुमचे गृह खरेदीचे स्वप्न नक्कीच साकार करू शकता, तेही सर्वाधिक कमी व्याजदराच्या मासिक हप्त्यासह. देवगिरी बँक देत आहे गृहकर्ज, फक्त ७ टक्के व्याजदराने. हाच आहे तुमच्यासाठी गृहखरेदीचा सहजसोपा मार्ग. आता फक्त तुमच्या मनासारखे घर निवड आणि तयारी करा नव्या घरात गृहप्रवेशाची. अगदी कमीत कमी कागदपत्रे आणि तात्काळ मंजुरी हीच तर या कर्ज योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. घराचे बांधकाम, नूतनीकरण करण्यासाठीही तुम्ही गृहकर्ज घेऊ शकता. आजच देवगिरी बँकेच्या जवळच्या शाखेला भेट देऊन, पाऊल उचला स्वप्नपूर्तीचे.
देवगिरी बँक वाहन कर्ज
मराठवाड्यातील आपली सर्वांची देवगिरी बँक नवीन घराबरोबरच शानदार कार, वेगवान बाईक आणि व्यावसायिक वाहनांच्या खरेदीसाठीही अर्थसाह्य पुरवते.
तुम्ही कुटुंबासाठी नवीन कार किंवा मुलींसाठी ई-बाईक घेण्याचा विचार करत असाल तर देवगिरी बँकेचे वाहन कर्ज तुमच्यासाठी सर्वच दृष्टीने अगदी योग्य आहे. देवगिरी बँक वाहन कर्जाद्वारे तुम्ही अलिशान वाहनातून आरामदायी प्रवासाचे स्वप्न साकार करू शकता. देवगिरी बँकेच्या वाहन कर्जाचा दरही सर्वांना परवडण्यासारखा आहे. प्रत्येकी एक लाख रुपयांच्या कर्ज रकमेसाठी फक्त 2064 रुपये एवढा मासिक हप्ता तुम्हाला भरायचा आहे. नव्या शानदार वाहन खरेदीचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच देवगिरी बँकेच्या जवळच्या शाखेला भेट द्या.
देवगिरी बँकेच्या विविध कर्ज योजना आणि आकर्षक व्याजदराच्या मुदत ठेव योजनांची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच संपर्क करा : 9022100400
Call Now





