देवगिरी बँकेच्या अर्थसाह्याने वाटचाल करा सुखसमृद्धीकडे
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही स्वप्नं अशी असतात, जी फक्त मनात नसतात… ती हृदयात घर करून बसतात. त्यापैकी सर्वात जवळचं, सर्वात प्रिय आणि आयुष्यभर आठवणीत राहणारं स्वप्न म्हणजे स्वतःचं घर घेणं किंवा प्लॉटवर मनासारखं घर बांधणं ! या आनंदासारखा दुसरा आनंद नाही. घरातल्या गृहलक्ष्मीच्या डोळ्यांतली इच्छा, तिच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि मुलांच्या हास्यात दिसणारं आपलेपण या सगळ्यांचा अर्थ घर या एका छोट्याशा शब्दात सामावलेला आहे. अनेकदा हे स्वप्न विचारात अडकून राहतं. कधी कधी हे स्वप्न चिंतेच्या सावटाखाली असतं. आर्थिक अडचणी, मोठी डाऊन पेमेंट्स, कर्ज प्रक्रियेची गुंतागुंत या सगळ्यातून मार्ग काढून, मनातलं हे स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी या दीपावलीत आली आहे. देवगिरी बँक (Deogiri Bank) तुम्हाला देत आहे ही संधी आकर्षक गृहकर्जाच्या माध्यमातून. तुमच्या घराच्या स्वप्नासाठी सुलभ गृहकर्ज, तेही सर्वात कमी 7% व्याजदराने (Low Interest Rate).
देवगिरी बँक गृहकर्ज (Deogiri Bank Home Loan)
दीपावलीच्या शुभमुहूर्तावर देवगिरी बँक (Deogiri Bank) घेऊन आली आहे तुमच्यासाठी गृहखरेदीचा (Home Loan) सोपा मार्ग. तुम्ही फक्त तुमच्या पसंतीचे घर (Row House) किंवा फ्लॅट (Luxurious Flats) निवडायचा आणि देवगिरी बँकेच्या आकर्षक गृहकर्जासाठी अर्ज करायचा. सर्वात कमी फक्त 7 टक्के व्याजदराने (Low Interest Rate) देवगिरी बँकेचे कर्ज येईल तुमच्या हातात आणि नव्या घरात तुमचा गृहप्रवेश साजरा होईल धुमधडाक्यात. देवगिरी बँकेच्या गृहकर्जाची वैशिष्ट्ये म्हणजे अगदी कमीत कमी कागदपत्रे आणि तात्काळ मंजुरी. घराचे बांधकाम, नूतनीकरण करण्यासाठीही हे गृहकर्ज (Home Loan) सर्वोत्तम आहे. तर मग आजच देवगिरी बँकेच्या जवळच्या शाखेला भेट देऊन गृहकर्जविषयी माहिती मिळवा आणि एक पाऊल उचला तुमच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने. आता उशीर करू नका. तुम्ही घरभाडे भारत असाल तर घरभाड्याऐवजी आता गृहकर्जाच्या मासिक हप्ता (EMI) भरा आणि स्वतःच्या सुंदर घरात प्रवेश करा. नव्या घराच्या खरेदीने नवजीवनाचा शुभारंभ करण्याची हीच तर खरी वेळ आली आहे.
देवगिरी बँक वाहन कर्ज (Deogiri Bank Vehicle Loan)
दीपावली हा सण आनंदाचा. कुटुंबासह साजरा करण्याचा. कुटुंबाची स्वप्ने साकार करण्याचा. दीपावलीच्या शुभमुहूर्तावर शानदार वाहन खरेदीचा. तुमचे हे स्वप्न साकारण्यासाठी मराठवाड्यातील आपली सर्वांची देवगिरी बँक (Deogiri Bank) घेऊन आली आहे आकर्षक वाहन कर्ज योजना (Deogiri Bank Vehicle Loan). या कर्जाद्वारे तुमचे वाहन खरेदीचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. तुम्ही कुटुंबासाठी नवीन कार किंवा मुलींसाठी ई-बाईक घेण्याचा विचार करत असाल तर या दीपोत्सवात हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. देवगिरी बँक वाहन कर्जाद्वारे तुम्ही हे स्वप्न साकार करू शकता. देवगिरी बँकेच्या वाहन कर्जाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी कागदपत्रे आणि तात्काळ मंजुरी. वाहन कर्जाचा दरही सर्वांना परवडण्यासारखा. प्रत्येकी एक लाख रुपयांच्या कर्ज रकमेसाठी मासिक हप्ता (EMI) असेल फक्त 2064 रुपये ! तर मग आजच देवगिरी बँकेच्या जवळच्या शाखेला भेट द्या !
देवगिरी बँक सोलार कर्ज (Deogiri Bank Solar Loan)
निसर्गाद्वारे अगदी निःशुल्क मिळणारी सौरऊर्जा (Solar Energy) मानवी जीवनासाठी खूपच फायद्याची आहे. सौरऊर्जेचा योग्य वापर करून अनेक यंत्रांची निर्मिती यशस्वी झाली आहे. आज घरोघरी सौरऊर्जेचा वापर होत असल्याचे आपण पाहत आहोत. अनेक घरांवर सौरऊर्जा संच (Solar Set) बसविण्यात आले आहेत. तुम्हालाही दर महिन्याला येणाऱ्या वीजबिलाच्या चिंतेपासून मुक्त व्हायचे असेल तर आजच घरावर सोलार एनर्जी सेट बसवा. त्यासाठी देवगिरी बँक घेऊन आली आहे सोलार कर्ज (Deogiri Bank Solar Loan). या योजनेअंतर्गत तुम्हाला 5 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. त्याचा व्याजदर (Low Interest Rate) अगदी माफक म्हणजेच फक्त 10% आहे. आता विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याची संधी तुम्हाला लाभत आहे. त्यामुळे आजच तयारी करा घरावर सोलार एनर्जी सेट (Solar Energy Set) बसवण्याची. देवगिरी बँक सोलार कर्ज (Deogiri Bank Solar Loan) घेण्यासाठी आजच आमच्या जवळच्या शाखेला भेट द्या.
जीवनाच्या प्रत्येक क्षणात देवगिरी बॅंक तुमच्यासोबत आहे.
। आपली बँक, देवगिरी बँक ।
देवगिरी बँकेच्या विविध कर्ज योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आजच संपर्क करा : 9022100400
Call Now





